इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅडिशनल मेडिसिन आणि बेळगाव महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने, देशव्यापी स्वच्छता पंधरवडा ‘स्वच्छता ही सेवा’ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून लोकसहभागातून स्वच्छता मोहीम हाती घेतली. महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांना आदरांजली म्हणून देशभरात आयोजित करण्यात येणारी ही एक मोठी स्वच्छता मोहीम आहे.
आयसीएमआर-एनआयटीएम आणि बेळगाव मनपाच्या वतीने पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बेळगावच्या प्रवेशद्वारावर स्वच्छता मोहीम राबवली. त्याचे उद्घाटन खासदार मंगल अंगडी यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार मंगल अंगडी, उपमहापौर रेश्मा पाटील, महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी राष्ट्रीय महामार्ग सेवा रस्त्याची स्वच्छता केली. फ्लो
यावेळी बोलताना खासदार मंगल अंगडी म्हणाल्या की, महात्मा गांधींचे स्वप्न असलेल्या स्वच्छ-सुंदर भारताची निर्मिती करण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतून स्वच्छता अभियानांतर्गत हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. यातून नवा भारत घडवण्याचे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे. स्वच्छता अभियान देशभरात सर्वत्र चांगले चालले आहे.
एनआयटीएमचे संचालक डॉ. सुबर्णा रॉय यांनी सांगितले की, पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बेळगाव शहराच्या एंट्री-एक्झिट पॉइंटवर ट्रायजंक्शनवर कचरा फेकला जातो. त्यामुळे बाहेरून शहरात येणाऱ्यांची मनात शहराविषयी वेगळीच प्रतिमा तयार होते. त्यामुळे आम्ही येथे स्वच्छता मोहीम राबवत आहोत. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून लोकांना स्वच्छतेचे महत्व कळावे म्हणून लोकसहभागातून हा उपक्रम राबवत आहोत.
या मोहिमेत बेळगाव महापालिका, एनआयटीएम तसेच आयसीएमआरचे कर्मचारी सहभागी झाले होते.
एकंदर, बेळगाव महानगरपालिकेसोबत आयसीएमआर-एनआयटीएमने हा उपक्रम राबवून नागरिकांत आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल जागरुकता वाढवण्याच्या प्रयत्नांना हातभार लावला असेच म्हणावे लागेल.


Recent Comments