बेळगावचे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी के एन राजण्णा यांचे वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगितले.
तीन काँग्रेसजनांना उपमुख्यमंत्रीपद द्यावे, या मंत्री के.एन.राजण्णा यांच्या विधानाला उत्तर देताना मंत्री सतीश जारकीहोळी राजण्णा यांनी वैयक्तिक विधान केले असून, डीसीएम पदाबाबत हायकमांड अखेर निर्णय घेईल. असे ते म्हणाले .
2008 मध्ये सतीश जारकीहोळी , सिद्धरामय्या आणि एच सी महादेवप्पा यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. कुमारस्वामी यांच्या वक्तव्याबाबत मीडियाने विचारले असता संबंधितांनी सांगितले की, हे मीडियासमोर सांगता येणार नाही, हा जुना मुद्दा आहे ज्यावर चार भिंतीच्या आत त्यांच्यात चर्चा झाली आहे. .
काँग्रेस सरकारच्या 100 दिवसांच्या कारकिर्दीने सर्वांचे समाधान झाले आहे, सरकारने कठीण काळात शक्ती योजना, गृहलक्ष्मी, गृहज्योती योजना राबवल्या आहेत.2 कोटी लोकांना शक्ती योजनेचा लाभ झाला आहे.
येत्या काळात बेळगाव जिल्ह्याचे विभाजन होणारच, जिल्ह्याचे विभाजन व्हावे यासाठी माझाही प्रयत्न आहे, बी.के.हरिप्रसाद हे मूळ काँग्रेसचे आहेत, ते पक्ष सोडणार नाहीत, हायकमांडला उत्तर देऊ, असे ते म्हणाले.
बी.एस.येडियुरप्पा यांनी राज्यात सरकारच्या विरोधात प्रचार केला आहे, त्याचा फायदा आमच्या सरकारला होणार आहे, खानापूर आणि बेळगाव तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्याचे कारण केंद्र सरकारचे निकष असल्याचे ते म्हणाले.


Recent Comments