चडचण शहर पोलीस ठाण्याच्या आवारात गणेश चतुर्थी व ईद मिलाद निमित्त आयोजित शांतता बैठक आयोजित करण्यात आली होती .
या बैठकीत बोलताना पीएसआय महादेव यलीगार म्हणाले , सण साजरे करणे हे अध्यात्माचे प्रतीक आहे. प्रत्येक कुटुंबाचा विकास तेव्हाच होऊ शकतो जेव्हा समाजात आरोग्य, व शांतता असते. गणेश प्रतिष्ठापना मंडळांनी स्थानिक स्तरावर पूर्व मान्यता घेवून मूर्तीची प्रतिष्ठापना करावी.
उत्सवादरम्यान प्रक्षोभक विधाने आणि असभ्य वर्तनास परवानगी देऊ नये. विद्युत अपघात टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी. सोशल मीडियावर खोट्या अफवा पसरवणाऱ्यांवर बारकाईने नजर ठेवून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी नगरपंचायतीचे माजी अध्यक्ष बाबुगौडा पाटील, माजी सदस्य नागराज निराळे, मल्लू धोत्रे , नेते चंद्रशेखर निराळे, सदाशिव बिरादार , महादेव बनसोडे आदींसह अनेकांची उपस्थिती होती.


Recent Comments