Belagavi

भारत जोडो यात्रेची वर्षपूर्ती : बेळगावात काँग्रेस कडून पदयात्रा

Share

विविधतेत एकतेचा संदेश देणाऱ्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढण्यात येऊन एक वर्ष होत आहे.

भारत जोडो स्मृती यात्रा बेळगाव काँग्रेस सदनापासून सुरू होऊन चन्नम्मा सर्कलपर्यंत नेण्यात आली .या पदयात्रेत बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार राजू सेठ, बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी, राहुल जारकीहोळी, विनय नावलगट्टी , राजा सलीम काशिमनवर, बसवराज शेगावी, अनंतकुमार ब्याकोड , आर.पी पाटील . अझीम पटवेगार प्रदीप एम जे. यांच्यासह काँग्रेसच्या अनेक महिला नेत्या आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी विनय नावलगट्टी म्हणाले कि , राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची वर्षपूर्ती झाली आहे . ह्या यात्रेने विविधतेत एकता वाढवत भारतातील सर्व समाज एकत्र आणून सर्वांमध्ये एकता निर्माण केली आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या द्वेषाच्या राजकारणावर टीका केली . काँग्रेस सरकारने राबवलेल्या जनहिताच्या योजनांचा लाभ घेण्याचे त्यांनी जनतेला आवाहन केले .

यावेळी मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या

Tags: