बेळगावातील टिळकवाडी येथील देशमुख रोड, साई मंदिर परिसरातील पथदीप 24/7 सुरूच ठेवण्यात येत असल्याने जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरु आहे.
होय, बेळगावातील टिळकवाडी येथील देशमुख रोडवर नव्याने बसविण्यात आलेले एलईडी दिवे बंद केले जात नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते ऍड. दीपक अवर्सेकर यांनी केली आहे. बेळगाव स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेले एलईडी पथदीप केवळ रात्रीच नव्हे तर दिवसाही सतत जळत आहेत. महापालिकेच्या संबंधित विभागाकडे वकील दीपक अवर्सेकर यांनी मंगळवारी याबाबत तक्रार केली.
संबंधित अधिकारी बेजबाबदारपणा दाखवत असून त्या ठिकाणी भेट देत नसल्याची तक्रार केली. त्यांना महापालिका अधिकाऱ्यांनी स्मार्ट सिटी कार्यालयात तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी टिळकवाडी येथील ई-स्मार्ट अधिकाऱ्यांना तक्रार देऊन पाहणी करण्यास सांगितले. अनेकदा भेट देऊन तक्रारी केल्या, मात्र अद्यापही कोणीही त्याची दखल न घेतल्याने या प्रकरणाची गांभीर्याने पाहणी करून किमान टायमर सिस्टीम बसविण्याची मागणी अवर्सेकर यांनी केली आहे.


Recent Comments