Chikkodi

महाराष्ट्राच्या सुळकुड पाणी प्रकल्पाला कर्नाटकच्या सीमावर्ती शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

Share

इचलकरंजीतील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी शेजारील महाराष्ट्र सरकारने दूधगंगा नदीच्या सुळकुड बॅरेजमधून पिण्याचे पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव दिला आहे. याला कर्नाटकच्या सीमावर्ती शेतकऱ्यांचा कडाडून विरोध करण्यात येत आहे .

सुळकुड पाणीपुरवठा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या दूधगंगा संवर्धन समितीला पूर्ण पाठिंबा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याचे गावचे सदस्य प्रमोदकुमार पाटील यांनी सांगितले.बेडकिहाळ गावात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे.

इचलकरंजी येथे अनेक उद्योगधंदे असल्याने प्रदूषित पाणी नदीत सोडले जाते, त्यामुळे बेडकिहाळ येथील रहिवासी पाणी वापरत नाहीत. पिण्याच्या पाण्याच्या बहाण्याने सुळकुड बॅरेजमधून पाणीपुरवठा प्रकल्प सुरू करण्यात आला असून, त्यामुळे राज्यातील दूधगंगा नदीकाठच्या गावांना व शेतकर्यांना मोठा फटका बसणार आहे.

याला आळा घालण्यासाठी दूधगंगा नदीकाठच्या गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे, तसेच बेडकिहाळ गाव बंद करून पाणीपुरवठा प्रकल्पाला आपला विरोध व्यक्त केला जात आहे.

साहित्य व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डी.एन. धाबडे यांनी याविषयी आपले मत मांडले . यावेळी ,, बाळासाहेब पाटील, शिवाजी पाटील, बंडा जोशी, अभय पाटील, प्रधान जुंबर, वासुदेव बिरुमाली, हसन मुल्ला, साताप्पा मगदुम्म, सुरेश गोणे, गजानन पाटील, संग्राम पाटील आदींचा समावेश होता.

Tags: