Belagavi

शेतकरी नेते कलगौडा पाटील यांच्या दोन्ही नातवांचे यश

Share

यमकनमर्डी मतदारसंघातील आगसगी गावातील शेतकरी नेते कलगौडा बाळाप्पा पाटील यांच्या दोन्ही नातवांनी आपापल्या क्षेत्रात प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

पाटील यांचा बीई पदवीधर झालेला एक नातू आता एमएस करण्यासाठी अमेरिकेला जात आहे तर दुसरा 14 वर्षाखालील राज्य फुटबॉल संघात निवड होऊन राष्ट्रीय स्पर्धा खेळण्यासाठी बेंगळूरहून रवाना होत आहे.

शेतकरी नेते कलगौडा पाटील अभिमानाने सांगतात की, गरिबीत जन्म घेतलेले कष्टाच्या बळावर हे यश मिळाले आहे. यासाठी यमकनमर्डीचे आमदार व सार्वजनिक बांधकाम तसेच बेळगाव जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांचे यासाठी प्रोत्साहन लाभले आहे. मंत्री जारकीहोळी यांनी कलगौडा पाटील यांच्या नातवांना यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: