गोकाक तालुक्यातील कोन्नूर नगरपालिकेत शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी लाखो रुपये खर्चून उभारलेला प्रकल्प आणि त्यातील उपकरणे अधिकारी, अभियंते व सदस्यांच्या इच्छाशक्तीअभावी गंज खात
पडली असल्याची घटना उघडकीस आली आहे.


लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी देण्यासाठी राज्य सरकार लाखो रुपये अनुदान देत आहे. मात्र कोन्नूर नगरपालिकेने शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी लाखो रुपये खर्चून आणलेली उपकरणे अधिकारी, अभियंते व सदस्यांच्या इच्छाशक्तीअभावी गंजत असल्याची घटना घडली आहे.
कोन्नूर नगरपालिकेच्या लोकांना शुद्ध पाणी देण्यासाठी 2021 मध्ये विशेष अनुदान देऊन विकत घेतलेला पंप संच, केबल आणि त्याची उपकरणे मरडीमठाच्या श्री लक्ष्मी मंदिराजवळील स्वच्छ पाणी पंपिंग युनिटच्या ठिकाणी जशीच्यातशी पडून आहेत.
आजतागायत पंपसेट, केबल्स व इतर साहित्य पाणी पोहोचवण्याऐवजी जमिनीवर पडून आहेत. ३० वर्षांपासून पालिकेत ठाण मांडून बसलेल्या अभियंत्यांना आता नादुरुस्त होणाऱ्या उपकरणांची पर्वा नाही, अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे ती गंज खात पडली आहेत. ही समस्या अनेकवेळा संबंधित अभियंता व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही, अधिकारी आज येथे आहेत उद्या दुसऱ्या ठिकाणी बदली होतील. मात्र जनतेने निवडून दिलेल्या सदस्यांनी जागे होऊन 48 लाख रुपयांची यंत्रसामग्री आणून उभारलेल्या प्रकल्प कार्यान्वित करणे गरजेचे आहे.


Recent Comments