जांबोटी रोडवरील होय शासकीय देवराज अरसू कार्यालयाच्या इमारतीत स्थानिक आमदार विठ्ठल हलगेकर यांनी शासनाच्या कोणत्याही आदेशाशिवाय भाजप पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांचे जनसंपर्क कार्यालय सुरु केले आहे, हे योग्य नाही. त्यामुळे बेळगावच्या जिल्हाधिकार्यांनी त्यांचे जनसंपर्क कार्यालय देवराज अरसू भवनातून हटवण्याचा आदेश मागासवर्गीय कल्याण विभागाला दिला आहे .

त्यामुळे काल ज्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले ते आज शासकीय अधिकाऱ्यांनी यशस्वीपणे शासकीय कार्यालय परत केले आहे.
शहरातील जांबोटी रोडवरील डी. देवराज अरसू भवनामध्ये स्थानिक आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते आदल्या दिवशी जनसंपर्क कार्यालयाचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले.
खानापूर तालुक्यासाठी देवराज अरसू भवन बांधण्यात आले व उद्घाटन खानापूरच्या माजी आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यांनी आपल्या कार्यकाळात शासकीय योजनांचा उपयोग व्हावा यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून भवन बांधून त्याचे उद्घाटन केले. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयाचा वापर न करता स्थानिक आमदाराच्या दबावाला बळी पडून शासकीय कार्यालय, जनसंपर्क कार्यालय म्हणून देऊन आपल्या अधिकाराचा बेजबाबदारपणा दाखवला आहे. शासकीय विभागांच्या कार्यालयांचा वापर करणाऱ्या अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावाला बळी पडून असे किळसवाणे वातावरण निर्माण होऊ दिल्याचे दिसते. त्यामुळे स्थानिक ब्लॉक काँग्रेस कमिटी व जनतेने शासकीय अधिकार्यांच्या विरोधात रान पेटवले असून मागासवर्गीयांसाठी बांधलेल्या इमारतीचा गैरवापर का होत आहे, यावरून गेल्या दोन-तीन दिवसांपासून सरकारी अधिकार्यांशी वाद घातला.
मागासवर्गीय लोकांच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी, शासकीय प्रशिक्षण, लोकसेवा यासाठी ही इमारत बांधण्यात आली आहे. मात्र विद्यमान आमदाराने परवानगी न घेता जबरदस्तीने या इमारतीत कार्यालय स्थापन केले होते. त्यामुळे बेळगावच्या मागासवर्गीय कल्याण विभागाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास येताच हे कार्यालय हटवण्याचे आदेश दिले आहेत. अशा कृत्यात सहकार्य करणाऱ्या खानापूरच्या अधिकाऱ्यांवर जिल्हास्तरीय अधिकारी काय कारवाई करतात, हे पाहावे लागेल .
आज बळजबरीने जप्त केलेले हे कार्यालय रिकामे करण्याचा आदेश शासनाने काढला असून, देवराज अरसू भवनात आमदार कार्यालयाला जागा देता येणार नाही, असा आदेश शासनाने काढला आहे.
हा मुद्दा राजकीय नसून हे मागासवर्गीय समाजाचे कार्यालय आहे. अशा प्रकारे देवराज अरसू जयंतीच्या पार्श्वभूमीवर खानापूरच्या देवराज अरसू इमारतीने सुटकेचा नि:श्वास टाकला असून उद्या देवराज अरसू जयंती मोठ्या दिमाखात साजरी होणार असल्याचे सांगितले. मात्र मागासवर्गीय समाजासाठी बांधलेल्या इमारतीत कार्यालय उभारणे योग्य नाही, असे ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी यांनी सांगितले.


Recent Comments