Belagavi

बेळगावात जागतिक फोटोग्राफी दिन, आरोग्य तपासणी शिबीर

Share

बेळगाव शहर आणि तालुका फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर्स असोसिएशनच्या वतीने बेळगावात आज जागतिक फोटोग्राफी दिन, आरोग्य तपासणी शिबीर आणि फोटो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
बेळगावातील कॅम्पमधील गंगाधर शानभाग सभागृहात शुक्रवारी बेळगाव शहर आणि तालुका फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर्स असोसिएशनच्या वतीने बेळगावात आज जागतिक फोटोग्राफी दिन, आरोग्य तपासणी शिबीर आणि फोटो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अनिल बेनके, डॉ. जगत, सुभाष ओऊळकर, अजित शानभाग, राजा कट्टी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते समारंभाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. जगत यांनी, फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी व्यवसायात अनेक वेळ उभे राहणे, सर्वत्र धावाधाव करावी लागते. त्यामुळे फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर्सना शारीरिक आणि मानसिक तणावाला, दुखण्यांना सामोरे जावे लागते.

यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी निरोगी जीवनशैली अवलंबण्याची गरज आहे. फिट राहणे आवश्यक आहे. वेळेत जेवण, वेळेत पूर्ण व शांत झोप घेऊन व्यावसायिक ताण व दुखणी टाळता येतात. मांसाहार केला तर चालेल पण तो मर्यादित स्वरूपात असावा. आहारात शक्यतो शाकाहाराचा समावेश करावा असा सल्ला त्यांनी दिला.

काळ कितीही बदलला तरी फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर्सचे महत्व अबाधित आहे. या व्यवसायात प्रशंसेबरोबरच टीकाही होते. पण टीकेची पर्वा न करता फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर्सनी सचोटीने व्यवसाय करावा असे आवाहन माजी आमदार अनिल बेनके यांनी यावेळी केले.

यावेळी संघटनेच्या ज्येष्ठ सदस्य व पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे सदस्यांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले.
समारंभात महादेव कंग्राळकर, सुरेश राजाई, डी. बी. पाटील, संजय हिशोबकर, संतोष पाटील, नामदेव कोळेकर यांच्यासह बेळगाव शहर आणि तालुका फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर्स असोसिएशनच्या सदस्यांची उपस्थिती होती.

Tags: