७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जायंट्स सखीने बेळगाव आणि परिसरातील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कॉलेज रोडवरील महिला विद्यालयात भव्य देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा आयोजित केली होती.त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून १६ माध्यमिक शाळेच्या संघांनी यात सहभाग नोंदवला.
व्हॉइस ओव्हर : यामध्ये मराठी विद्यानिकेतन शाळेचा प्रथम क्रमांक आला असून द्वितीय व तृतीय क्रमांक माहेश्वरी अंधशाळा व संत मीरा हायस्कूल या शाळांचा आला. उत्तेजनार्थ बक्षिसे महिला विद्यालय मराठी माध्यम, लिट्टल स्कॉलर स्कुल व सरदार हायस्कूल यांनी पटकावली.
सुरुवातीला स्पर्धेचे उदघाटन अध्यक्षा विद्या सरनोबत, माजी अध्यक्षा चंद्रा चोपडे यांच्याहस्ते दीपप्रज्वलित करून करण्यात आले, यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. सहभागी शाळांनी आपापले कौशल्य सादर केल्यानंतर परीक्षकांनी निर्णय दिला. (फ्लो )
शेवटी बक्षीस वितरण कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जायंट्स इंटरनॅशनलचे विशेष समिती सदस्य मोहन कारेकर, महिला विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्र्वनाथ पाटील,गीता ताशीलदार, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत ज्योती सांगुकर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा सन्मान विद्या सरनोबत यांच्याहस्ते भेटवस्तू आणि गुलाबपुष्प देऊन करण्यात आले.
अध्यक्षा सरनोबत यांनी अध्यक्षीय समारोप करताना विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम वाढावे व त्यांची गायन प्रतिभा विकसित व्हावी याउद्देशाने ही स्पर्धा घेतल्याचे सांगून विद्यार्थ्यांचे आभार मानले.
मोहन कारेकर यांनी इतक्या मोठ्या भव्य स्पर्धा भरवत असल्याबद्दल सखीचे कौतुक केले व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यानंतर विजेत्या संघाना व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम स्मृतिचिन्ह आणि गुलाबपुष्प देण्यात आले तर सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या संपूर्ण स्पर्धेचे परिक्षक म्हणून मृदुला हुद्दार, विद्या हेगडे, उज्वला देशपांडे यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती अनगोळकर यांनी तर आभार सुलक्षणा शिनोळकर यांनी मानले.


Recent Comments