बेळगाव स्मार्ट सिटीच्या रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम रहदारी पोलिसांच्या सहकार्याने , महापालिकेने हाती घेतली आहे . राणी चन्नम्मा सर्कलपासून खाली काकतीवेसकडे येणाऱ्या रस्त्याच्या कडेला अतिक्रमित टपरी , खोके आणि हातगाड्या हटवून , रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून दिला.


बेळगाव शहराच्या विस्ताराप्रमाणेच वाहनांची संख्या देखील वाढली आहे . रस्त्यांचे रुंदीकरण करून देखील वाहतूक कोंडीच्या समस्या निर्माण होतच आहेत . चन्नमा सर्कलपासून खाली काकतीवेसला जाणाऱ्या रस्त्यावर , सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजच्या समोरील बाजूस रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत हातगाड्या लावून , खाद्यपदार्थ , स्टेशनरी, कपडे , चप्पल्सचे स्टॉल .. यामुळे खाद्यपदार्थ खाण्यासाठी तसेच अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांची या ठिकाणी सतत गर्दी असते .
जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय तसेच अन्य शासकीय कार्यालयांकडे जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची देखील या मार्गावर गर्दी असते . त्यामुळे या ठिकाणी कायम वाहतूक कोंडी होत असते . हि समस्या दूर करण्यासाठी , आज महानगरपालिकेचे अतिक्रमण हटाव पथकाने , रहदारी पोलिसांच्या सहकार्याने इथले अतिक्रमण हटवण्यात आले . अनधिकृतपणे रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांच्या हातगाड्या , महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने जप्त केल्या .
अचानकपणे ही अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आल्याने विक्रेते भांबावून गेले . त्यांच्या गाड्या महापालिकेच्या पथकाने उचलून नेल्याने,

आता आम्ही जगायचे कसे, आमच्या कुटुंबाचे पालनपोषण कसे करायचे ? इतकी वर्ष आम्ही या ठिकाणी व्यवसाय करतोय मग आताच का ही कारवाई केली ? ते प्रश्न त्यांना पडले .आम्हाला व्यवसाय करण्यासाठी जागा निश्चित करून द्या अशी मागणी देखील एका विक्रेत्याने केली .
या संदर्भात ट्राफिक पोलीस अधिकाऱ्यांशीदेखील या विक्रेत्यांनी चर्चा करून न्याय देण्याची मागणी केली . मात्र पालिकेकडून ही अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले .
या रस्त्यावरील अतिक्रमण हटवून , वाहतुकीसाठी हा रस्ता मोकळा करून देण्यात आल्याने , वाहन चालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे .


Recent Comments