Banglore

माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा रामलिंग रेड्डी यांना टोला

Share

मला लोकांची दिशाभूल करून राजकारण करण्याची गरज नाही, परिवहन विभागाचे आदेश पाहून राज्यातील जनतेला सत्य सांगण्याचे काम मी केले आहे असे सांगत माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्यावर पलटवार केला.
बोम्मई यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे की, परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी शक्ती योजनेंतर्गत जून महिन्यात परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये राज्यातील महिलांनी 20 दिवस मोफत प्रवास केल्याने चार परिवहन महामंडळांना 250 कोटी रुपये दिले आहेत. प्रवास खर्चाची परतफेड करण्यासाठी 1 ऑगस्ट रोजी चार महामंडळांना 125 कोटी रुपये देण्यात आले, असे आदेश तुमच्याच विभागाने दिले.
परिवहन महामंडळांची मागणी आणि शासनाने जाहीर केलेले अनुदान निम्म्याहून कमी असून, अशा स्थितीत आधीच तोट्यात चालणाऱ्या परिवहन महामंडळांकडे कर्मचाऱ्यांचे पगार, बसेसची देखभाल, डिझेल यासाठी पैशांची कमतरता भासणार आहे. त्याबाबत मी राज्यातील जनतेला माहिती दिली आहे, असे बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले.

Tags: