Belagavi

केएलएस आयएमईआर फुटबॉल ट्रॉफी सीझन 2चा ट्रॉफी लाँच

Share

केएलएस आयएमईआरतर्फे फुटबॉल ट्रॉफी सीझन 2 चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा ट्रॉफी लाँच समारंभ आणि सामने निश्चिती बैठक आयएमईआर कॅम्पस येथे आज पार पडली.

केएलएस आयएमईआर फुटबॉल ट्रॉफी सीझन 2 चा चषक अनावरण सोहळा आणि सामने निश्चितीची बैठक आयएमईआर कॅम्पस येथे आज दुपारी पार पडली. यावेळी सहभागी 19 संघांचे कर्णधार आणि शारीरिक शिक्षण संचालक उपस्थित होते.

केएलएस आयएमईआर संचालक डॉक्टर आरिफ शेख, शारीरिक शिक्षण संचालक जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले. शिक्षण संचालक श्रीकांत नाईक, सुनील कुलकर्णी, विजय रेडेकर, डॉ. रामकृष्ण. एन., आदी यावेळी उपस्थित होते. आयएमईआरची विद्यार्थिनी रक्षा पांडे हिने सूत्रसंचालन केले.

Tags: