Belagavi

कडोली येथील कृषि पत्तीन सहकारी पतसंस्थेची अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक बिनविरोध

Share

कडोली येथील कृषि पत्तीन सहकारी पतसंस्थेची अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणिकीत सर्वानुमते बिनविरोध पार पडली . गजानन कागणिकर यांची अध्यक्षपदी तर इराप्पा कोल्हे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

तर अशोक भोसले,प्रकाश राजाई,रामा देसाई,कल्लाप्पा संभाजी,प्रमिला शिंदे,सुमन अप्टेकर,अप्पय्या मरगाळे, नागाप्पा अप्पुगोळ,मनोहर कोरे व विराप्पा नाईक या सर्वांचीही याआधिच सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. यानिवडीसाठी माजी जि.पं.उपाध्यक्ष अरुण कटांबले व माजी ग्रा.पं.अध्यक्ष राजु मायाण्णा यांनी प्रयत्न व मार्गदर्शन केले.
सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांची शाल,हार ,पुष्प व गुलाल लाऊन स्वागत करण्यात आले.निवडणूक अधिकारी म्हणून आर.बी.पाटील होते.तर कडोली,गुंजेनट्टी,केदनुर,मण्णिकेरि,देवगिरि,बंबरगा,कट्टणभावि,होसुर व भूतरामट्टी या सर्व गावांची मिळून हि संस्था आहे.

नंतर कार्यक्रमाला उद्देशून माजी जि.पं.उपाध्यक्ष अरुण कटांबळे म्हणले कि , हि अत्यंत जुनी शेतकर्यांची पतसंस्था असली तरी याआधी फक्तच खत विक्रीच करत आलो असुन दुसरे उत्पन्नाचे काहीच स्त्रोत नाही तरी इतर विकसित पिकेपिएस संस्था कोणत्याप्रकारे व्यवहार करतात त्याची माहिती मिळवून शेतकर्यांना खत,बी-बियाणे,औषधे वाजवी आणि योग्य दरात मिळवून देऊन संस्थेचा विकास आणि शेतकर्यांना सर्व सुविधा मिळवून द्याव्यात आणि तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतिश जारकिहोळी यांच्या माध्यमातून आणि डिसिसि बॅंकेच्या माध्यमातुनही शॅापिंग कॉम्प्लेक्स बांधून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करण्याचाही सल्ला देऊन नूतन अध्यक्ष गजानन कागणिकर व उपाध्यक्ष इराप्पा कोल्हे हे अत्यंत अनुभवी असल्याने सर्व संचालक मंडळीना विशवासात घेऊन संस्थेचा सर्वांगीण विकास करतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली

नंतर माजी ग्रा.पं.अध्यक्ष श्री मायाण्णा बोलतांना याआधी संस्थेमध्ये खतविक्रि इतकेच केले असुन याशिवाय उत्पन्नाचे इतर उत्पन्नाचे स्त्रोत नाही तरि नूतन अध्यक्ष गजानन कागणिकर व उपाध्यक्ष इराप्पा कोल्हे अत्यंत अनभवि असुन सोसायटीची जागा उपलब्ध असुन सद्या सार्वजनिक बांधकामंत्रि सतिश जारकिहोळी असुन योगायोगाने हि एक सवर्णसंधी आहे . शॉपिंग कांप्लेक्स बांधून शेतकरी व ग्रामस्थांना याचा लाभ होईल व संस्थेचा विकासही होईल असे सांगून सध्या कृषि विभागीय कार्यालय काकती येथे चालु असुन त्यांना इमारत उपलब्ध करुन दिल्यास कडोलीला हे कार्यालय स्थलांतरित होऊन गावच्या शेतकर्यांना याचा लाभ होणार असल्याचेही सांगितले

नंतर नूतन अध्यक्ष कागणिकर यांनी त्यांच्या या बिनविरोध निवडीला ज्या कोणी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केले त्यासर्वांचे आभार मानले . एकट्याने विकास होत नाही तर सर्व बाराही संचालक मंडिळींनी सहकार्य केल्यासच होणार असुन सर्वांना विश्वासात घेऊन मंत्री सतिश जारकिहोळी,माजी जि.पं.उपाध्यक्ष अरुण कटांबले,माजि ग्रा.पं.अध्यक्ष राजु मायाण्णासह सर्व नेत्यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने संपुर्ण बेळगाव जिल्ह्यातच नंबर वन संस्था करणार असल्याचेही त्यानी सांगितले. ( )

नंतर उपाध्यक्ष श्री कोल्हे यानीही आपले मनोगत व्यक्त केले.

Tags: