Belagavi

छळाला कंटाळून फेसबुक लाईव्ह करत विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

Share

वकिलाच्या छळाला कंटाळून फेसबुक लाईव्ह करत विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना रायबाग तालुक्यातील संसुद्धी गावात घडली आहे. या घटनेने खळबळ एकच खळबळ माजली आहे.

रायबाग तालुक्यातील संसुद्धी गावात छळाला कंटाळून त्यांनी कुटुंबासह विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. फेसबुक लाईव्ह व्हिडीओ करत पतीने विष प्राशन केले. पतीने विष घेतल्याचे पाहून पत्नीनेही विष घेतले. हलप्पा सुराणी आणि महादेवी सुराणी या दाम्पत्याने विष घेतले.

हलप्पा सुराणी हे रायबाग तहसीलदार कार्यालयातील भूमी नोंदणी विभागात आऊटसोर्स तत्त्वावर कार्यरत होते. सध्या हलप्पा आणि त्यांच्या पत्नीला हारुगेरी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काल रात्री उशिरा फेसबुक लाईव्ह करत विष घेतले. हलप्पा यांनी रायबाग येथील वकील सदाशिव निडोनी यांच्यावर आरोप केला आहे. 2018 पासून सदाशिव निडोनी मला त्रास देत आहे. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून मानसिक छळ केल्याचा आरोप त्याने केला आहे. सदाशिव निडोनी नावाच्या व्यक्तीने कार्यालयात येऊन मला शिवीगाळ केली. त्यांनी मला दहा लाख रुपये दे नाही तर खोटा गुन्हा दाखल करून धडा शिकवू अशी धमकी दिली. माझ्यावर गुन्हा दाखल करू, आणि पैसे न दिल्यास मला तुरुंगात पाठवू अशी धमकी दिली

त्यांच्या भीतीने मी घर सोडून बाहेर पडलो होतो, आज अटकपूर्व जामीन मिळाल्यावर घरी आलो. बायको आणि मुलांचे चेहरे बघून मी मरायचे ठरवले आहे असे सांगत विष प्राशन केलेल्या हलप्पा सुराणा यांनी आपल्या कुटुंबाला न्याय द्यावा, अशी याचना केली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. हारुगेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

Tags: