आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू प्रवीण कणबरकर याने साऊथ आशिया बॉडीबिल्डिंग स्पर्धेत चौथा क्रमांक पटकावून देशाचे नाव उंचावले आहे.
बेळगाव येथे राहणाऱ्या प्रवीण कणबरकर याने गेल्या अनेक वर्षांपासून बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रामध्ये विविध टायटल्स जिंकली आहेत. मिस्टर बेळगाव चॅम्पियन ऑफ चॅम्पियन, मिस्टर सतीश शुगर्स क्लासिक अवार्ड चॅम्पियन, मिस्टर कर्नाटक चॅम्पियन,
२०१८ मध्ये मिस्टर इंडिया चॅम्पियन तर आता २०२३ मध्ये मिस्टर साऊथ आशिया चॅम्पियन असे यश मिळवले आहे. नुकतीच मालदीवमध्ये ही स्पर्धा झाली. आपल्या यशाबद्दल प्रवीण कणबरकर यानेइन न्यूजला अधिक माहिती दिली

ऍडव्होकेट एम. एम. शेख, संजय सुंठकर, किरण अप्पीमरद, सुनील आपटेकर, अजित सिद्दण्णावर यांच्या प्रोत्साहनामुळे त्याने हे यश मिळवले आहे. याबद्दल त्यांनी पूर्वीचे कौतुक केले आहे.


Recent Comments