बेळगाव महानगर पालिकेच्या चारही स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनाचे आज समारंभपूर्वक उदघाटन करण्यात आले.
बेळगाव महानगर पालिकेच्या चारही स्थायी समिती अध्यक्षांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पालिका आवारातील संसद भवनाच्या धर्तीवर उभारलेल्या इमारतीत या चारही स्थायी समितींच्या अध्यक्षांसाठी स्वतंत्र दालने स्थापन करण्यात आली आहेत. महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील यांच्याहस्ते या दालनांचे फीत कापून उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी पालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, उपयुक्त लक्ष्मी निपाणीकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष रवी धोत्रे, लेखा समिती अध्यक्षा सविता पाटील, नगर नियोजन व बांधकाम स्थायी समिती अध्यक्षा वाणी जोशी, आणि कर, वित्त आणि अपील स्थायी समितीच्या अध्यक्षा वीणा विजापुरे यांच्या कक्षांचे महापौर शोभा सोमनाचे यांच्याहस्ते फीत कापून उदघाटन करण्यात आले. उदघाटन समारंभानिमित्त चारही स्थायी समिती अध्यक्षांच्या कक्षात धार्मिक विधींसह देवदेवतांचे पूजन करण्यात आले. फ्लो
यावेळी नगरसेवक तसेच पालिका अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments