अनगोळ-वडगाव रोडवरील समृद्धी कॉलनीमध्ये नूतनीकरण केलेल्या उद्यानाचे उदघाटन करण्यात आले.
बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी विकासकामांबद्दल कसलीही तडजोड न करता लोकांना ज्या सुविधा हव्या त्या देण्याचे काम गेली अनेकवर्षे करत आहेत. समृद्धी कॉलनीत अनेक वर्षांपासून एक जुने उद्यान होते. त्याची दुरवस्था झाली होती. त्याचे आमदार अभय पाटील यांनी सुमारे एक कोटी रुपये खर्चातून नूतनीकरण केले आहे. या निधीतून उद्यानात लहान मुलांसाठी खेळाची उपकरणे, बसण्यासाठी बाके आदी सुविधा पुरवल्या आहेत.
आज या उद्यानाचे आमदार अभय पाटील यांनी उदघाटन केले. या उद्यानात मुलांना खेळण्यासाठी अनेक प्रकारचे साहित्य, जिम्नॅशियम उपकरणे, गप्पांचा कट्टा यासहित छोट्या कार्यक्रमांसाठी व्यासपीठ आदी सुविधा दिल्या आहेत. त्यांचा लोकांनी सदुपयोग घेऊन, उद्यान स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी वार्ड क्र. 50च्या नगरसेविका सारिका पाटील व स्थानिक रहिवाशांनी आमदार अभय पाटील यांचे आभार मानले. यावेळी नगरसेवक श्रीशैल कांबळे, मंगेश पवार, अभिजित जवळकर व स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.


Recent Comments