Belagavi

बेळगावच्या पिरणवाडीजवळ तरुणाचा निर्घृण खून

Share

बेळगाव शहरातील हुंचेनट्टी गावातील अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना उशिरा उघडकीस आली आहे.

गुरुवारी रात्री अभियांत्रिकी महाविद्यालयामागील आवारात मद्यधुंद अवस्थेतील काही तरुणांचे भांडण झाले. या गोंधळातच तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अरबाज मुल्ला (वय २५ ) , राहणार पिरणवाडी याचा खून झाला आहे .

खुनाचे नेमके कारण समजू शकलेले नाही. गांजा किंवा दारूच्या नशेत हा गोंधळ झाला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

डीसीपी शेखर एच टी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी, फॉरेन्सिक लॅबची टीम तसेच श्वानपथकासह भेट देऊन पाहणी केली . या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे .

Tags: