बेळगाव येथील चव्हाट गल्लीतील श्री देवदादा सासनकाठी या देवस्थानाच्या वतीने देवरवाडी येथील श्री क्षेत्र वैजनाथ
येथे अभिषेक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .

सोमवारी , देवस्थानच्या वतीने दुपारी महादेवाला अभिषेक घालून महाआरती करण्यात आली त्यानंतर पार्वती मंदिर येथे पूजन करून वैजनाथ देवाला समस्त बेळगावकरांसाठी साकडे घालण्यात आले
चांगला पाऊस होऊ दे, पीक पाणी चांगलं येऊ दे, रोगराई नष्ट होऊ दे व जनतेमध्ये सुख समाधान नांदू देत ,सर्व भक्तांवरती कृपा राहू दे म्हणून साकडे घालण्यात आले
लक्ष्मण किल्लेकर सासनकाठीचे चे पुजारी मंदिरात यांनी अभिषेक व पूजा करून विधी केले
या कार्यक्रमाला नागेश नाईक, प्राचार्य आनंद आपटेकर, जोतिबा किल्लेकर, नामदेव नाईक, परिश्रम किल्लेकर, अनिकेत घोरपडे ,अशोक कंग्राळकर आदी उपस्थित होते


Recent Comments