किनार पट्टीच्या जिल्ह्यांत पाऊसाचे जोरदार आगमन झाले आहे मात्र उत्तर कर्नाटकात अपुऱ्या पावसाअभावी , जुलै महिना सुरू झाला तरी अद्याप पुरेसे पीक आलेले नाही

बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी उपविभागांतर्गत पावसाअभावी उसाचे पीक वाळून चालले आहे . हजारो हेक्टरमध्ये पिकवलेला ऊस सुकून गेला असून शेतकरी हतबल झाला आहे.

चिक्कोडी, अथणी, रायबाग तालुक्यात सर्वाधिक ऊस उत्पादक शेतकरी आहेतचांगले पीक येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्याची निराशा झाली. गेल्या ऑगस्टमध्ये लावलेला ऊस पूर्णपणे सुकून खराब झाला आहे .
दोन वर्षांपासून आलेल्या पुरात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे . यंदा पावसाशिवाय हजारो हेक्टरवरील ऊस सुकून गेला आहे. चिक्कोडी उपविभागाखालील तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्याची तसेच सर्वेक्षण करून योग्य मोबदला देण्याचे आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे .
नेहमीप्रमाणे जून महिन्यात चिक्कोडी तालुक्यात ९० मिलिमीटर पाऊस व्हायला हवा होता. मात्र यंदा जून महिन्यात केवळ 20 मिलिमीटर पाऊस झाला असल्याची माहिती चिकोडी उपविभागीय अधिकारी माधव गीते यांनी दिली


Recent Comments