Belagavi

गुरुपौर्णिमेनिमित्त जोतीबा मंदिरात महाप्रसादाचे वाटप

Share

गुरुपौर्णिमेनिमित्त येथील नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थान जोतीबाला लघुरुद्राभिषेक करण्यात आला.

तसेच दादा महाराज अष्टेकर यांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले.

 

याप्रसंगी पौर्णिमेनिमित्त सत्यनारायणाची पूजा देखील पार पडली. त्यानंतर जोतिबाची आरती म्हणून नैवेद्य दाखविण्यात आला.

त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी जोतिबा देवाची आकर्षक अशी आरास करण्यात आली होती.यावेळी शेकडो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Tags: