जीवन विद्या मिशन बेळगाव शाखेच्या वतीने दरवर्षाप्रमाणे यावर्षीही सद्गुरु श्री वामनराव पै यांच्याविषयी कृतज्ञता दिन म्हणून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.
बेळगाव शहरातील मराठा मंदिर येथे जीवन विद्या मिशन तर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह आध्यात्मिक मार्गदर्शन सोहळा पार पडला. सकाळपासूनच विविध सद्गुरूंचे शिष्य अर्थात नामधारकांचे सद्गुरुंवर आधारित भजन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम ही यावेळी पार पडले. दुपारी गुरुवंदना कार्यक्रमासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या मार्ग तत्त्वावर चालणारे जवळपास 5000 पेक्षा जास्त बेळगाव शहर व उपनगरामध्ये नामधारक सध्या कार्यरत आहेत. ते सकाळपासूनच अगदी उत्साहाने गुरुपौर्णिमेनिमित्त ईश्वर प्रार्थना गात होते या कार्यक्रमाला डोंबिवलीचे व्याख्यानकार म्हणून शैलेश रेगे यांनी शांती सुखाचा मार्ग देणारे सद्गुरु वामनराव पै यांनी लिहिलेल्या ज्ञानाचा अनुभव कथन केला व उपस्थित नामधारकांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी बेळगाव शाखेचे प्रमुख शंकर बांदकर, मराठा मंदिरचे माजी अध्यक्ष शिवाजीराव हंगीरगेकर, अध्यक्ष अप्पासाहेब गुरव, प्रकाश पाटील, रमेश मुतगेकर आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.


Recent Comments