Belagavi

बेळगाव जिल्ह्याला अधिक, नव्या बस देऊ अशी ग्वाही परिवहनमंत्री रामलिंग रेड्डी

Share

बेळगाव जिल्ह्याला अधिक, नव्या बस देऊ अशी ग्वाही परिवहनमंत्री रामलिंग रेड्डी यांनी दिली. बेळगावातील नव्या मध्यवर्ती बसस्थानकाला भेट देऊन पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

परिवहन मंत्री रामलिंगारेड्डी यांनी आज बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकाला भेट दिली. परिवहन अधिकाऱ्यांनी नूतन मंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मंत्र्यांनी केएसआरटीसीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी नवीन मध्यवर्ती बस स्थानकाची पाहणी केली. बसस्थानकावर मंत्र्यांनी प्रवाशांशी संवाद साधला. त्यांनी स्त्रीशक्ती योजनेबद्दल महिला प्रवाशांकडून अभिप्राय जाणून घेतला.

नवीन बसस्थानकावरील आरोग्य केंद्राला भेट देऊन त्यांनी माहिती घेतली. फ्लो
दरम्यान, बसस्थानकाची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री रामलिंग रेड्डी यांनी बेळगाव जिल्ह्याला अधिकाधिक नवीन बसेस आणि फेऱ्या देण्याची ग्वाही दिली. राज्यातील चारही परिवहन मंडळांसाठी चार हजार नवीन बस खरेदीचा प्रस्ताव मागील सरकारने घेतला आहे. त्या लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. त्यानंतर अपुऱ्या बसची समस्या संपुष्टात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ३३० कोटी रुपये खर्चातून बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकाचे काम पूर्ण झाले असून, काँक्रिटीकरणासाठी एक कोटी रुपये निधीची मागणी पुढे आली आहे.

ती पूर्ण करून उरलीसुरली सर्व कामे पूर्ण करण्यात येतील. याठिकाणी परिवहन कर्मचाऱ्यांसाठी छोटा दवाखानाही सुरु करण्यात आला असून प्रवाशांनाही त्याचा लाभ घेता येईल. त्याशिवाय ४० दुकाने तयार असून, खर्च वसूल होईल अशा पद्धतीने भाडे देणाऱ्या निविदा मंजूर करून ती भाड्याने देण्यात येतील असे त्यांनी सांगितले. बेळगावात शहर बस वाहतुकीसाठी स्वतंत्र भव्य बसस्थानक उभारण्याचा विचार आहे.

त्यामुळे शहरावर पडणारा वाहतुकीचा ताण विभागला जाऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल अशी अपेक्षा असल्याचे परिवहन मंत्री रामलिंग रेड्डी यांनी व्यक्त केली. बाईट.
यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ, परिवहन मंडळाचे अधिकारी, काँग्रेस नेते उपस्थित होते.

Tags: