अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची बेळगांव शाखा आणि कन्नड सांस्कृतीक भवन बेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाट्य महोत्सवाची सांगता शास्त्रीय संगीत, गीत गायनाच्या कार्यक्रमाने झाली.
बेळगावातील रामदेव हॉटेलजवळील शेख होमिओपॅथी महाविद्यालयाच्या समोरील कन्नड सांस्कृतिक भवन नेहरूनगर बेळगाव येथे नुकताच मराठी नाट्य महोत्सव संपन्न झाला. त्याच्या सांगता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी नाट्य
परिषदेच्या बेळगाव शाखाध्यक्षा वीणा लोकूर होत्या. स्वागत व प्रास्ताविक आरपीडी महाविद्यालयाच्या माजी मराठी विभाग प्रमुख संध्या देशपांडे यांनी केले. के एल ई स्कूल ऑफ म्युझिक बेळगावच्या ज्येष्ठ गायिका प्राचार्य डॉक्टर दुर्गा नाडकर्णी व अन्य गायक-गायिकांनी शास्त्रीय गीते सादर करून रसिकांची मने जिंकली.
निवेदन प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र भांडणकर यांनी केले. गायिका प्रा. डॉ. स्नेहा राजुरीकर, प्राध्यापक डॉक्टर पंडित राजाराम आंबर्डेकर, प्राध्यापक संगीता बांदेकर, अनिमिष हेगडे, प्राध्यापक योगेश रामदास, सुजाता हुंच्चेनट्टी, स्वाती हुद्धार, तबलावादक साथ राहुल मंडोळकर, हार्मोनियम साथ भक्ती आंबर्डेकर, ऑर्गन साथ यादवेंद्र पुजारी, ताल व झांजवादकची साथ जितेंद्र साबणावर यांनी केली. दिली. यावेळी शंकर चौगुले, अनिल चौधरी, गीता कित्तूर, निलेश शिंदे,
श्रीधर कुलकर्णी, अजित पाटील, कीर्ती टेंबे, विजय पाटील, मानसी भातकांडे , श्रीधर पाटील, आनंद गाडगीळ, विनय जठार, अनिल पाटील, प्रकाश फडणीस अनिल कागल, विशाल पाटील तसेच संस्थेचे पदाधिकारी व सदस्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments