Banglore

धीरज देशमुख, राघवेंद्र यांनी केले मंत्री हेब्बाळकरांचे अभिनंदन

Share

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आमदार धीरज देशमुख आणि लोकसभा सदस्य बी वाय राघवेंद्र यांनी सोमवारी राज्य सरकारच्या नवीन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.


बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्क्याने विजय मिळवला. त्या पाठोपाठ त्या राज्याच्या महिला व बालकल्याण, अपंग पुनर्वसन आणि ज्येष्ठ नागरिक सबलीकरण खात्याच्या मंत्रीही झाल्या.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र आमदार धीरज देशमुख आणि लोकसभा सदस्य बी वाय राघवेंद्र यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. आमदार धीरज देशमुख यांनी मंत्री हेब्बाळकर यांच्या निवडणूक प्रचारात भाग घेतला होता. या भेटीवेळी हेब्बाळकर यांचे बंधू विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी उपस्थित होते.

Tags: