बेळगावात 13 मे रोजी पार पडलेल्या मतमोजणीवेळी टिळकवाडीतील आरपीडी क्रॉस येथे पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या देशविरोधी समाजकंटकांवर कारवाई करा अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे.
नॅशनल काँग्रेस वर्कर्स कमिटीचे अध्यक्ष संजय गोटाडकी यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष हेमंत, जिल्हाध्यक्ष सुजय गोटाडकी आदींच्या शिष्टमंडळाने आज बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी आरपीडी क्रॉस येथे पाकिस्तान झिंदाबाद अशा घोषणा देणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी या निवेदनात केली आहे.


Recent Comments