Belagavi

दक्षिणमध्ये 400 बोअरवेल्स, टंचाईच्या ठिकाणी टँकरने पुरवणार पाणी : आ. अभय पाटील

Share

बेळगाव दक्षिण मतदार संघातील पाणी समस्या सोडविण्यासाठी सुमारे 400 बोअरवेल्स खोदण्यात आल्या असून, तरीही जेथे पाणीटंचाई जाणवत आहे तेथे टँकरने पाणी पुरवण्यात येईल असे आमदार अभय पाटील यांनी सांगितले.

आमदार अभय पाटील यांनी आज टिळकवाडीतील तिसरे रेल्वेगेट ते रेल्वे उड्डाणपूल या अटलबिहारी वाजपेयी मार्गाच्या व्हाईट टॉप काँक्रिटीकरण कामाची पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती देऊन त्यांनी सांगितले की, दक्षिण मतदारसंघातील शहरी भागात लवकरच 24X7 कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. दक्षिणध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू नये यासाठी गेल्या 3-4 महिन्यात सुमारे 400 बोअरवेल्स खोदण्यात आल्या आहेत. अनगोळ नका येथे बिग बाजारसमोर आणि चावडी गल्ली,

वडगाव येथे ओव्हरहेड टॅंक बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. तेथून अनगोळ, वडगाव, खासबाग, शहापूर भागाला रोज एक तास पाणी पुरवण्यात येईल. प्रात्यक्षिक स्वरूपाच्या या पुरवठ्यानंतर सहा महिन्यात 24X7 कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना राबविण्यात येईल. त्याचप्रमाणे उद्यमबाग, कावेरीनगर, महाद्वाररोड भागात ओव्हरहेड टॅंक बसविण्यात येतील. जर कोण्याही भागात पाणीटंचाई जाणवत असेल तर नागरिकांनी त्यांच्या स्थानिक नगरसेवकांशी संपर्क साधावा, त्या भागात तातडीने टँकरने पाणी पुरवण्यात येईल असे आमदार अभय पाटील यांनी सांगितले. बाईट
यावेळी मनपा अधिकारी उपस्थित होते.

Tags: