Belagavi

काँग्रेसच्या अंतर्गत बाबींची भाजपला काळजी करण्याची गरज नाही : मंत्री सतीश जारकीहोळी

Share

काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत कारभाराची भाजपला काळजी करण्याची गरज नाही, सरकारचा कारभार नीट होत नसेल तर त्यांनी टीका करावी असा टोला सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी भाजपला लगावला.

गोकाकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, आमच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आमचे नेतेच सोडवतील आणि काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत प्रश्नांवर भाजपला त्रास करून घेण्याची गरज नाही. चक्रवर्ती सुलिबेले हा समाजात संभ्रम निर्माण करणारा माणूस आहे, तेच अशी आश्वासने देतात जी पंतप्रधान मोदी देत नाहीत अशी प्रतिक्रिया त्यांनी मंत्री एम बी पाटील यांच्या चक्रवर्ती सुलिबेले संदर्भातील वक्तव्यावर दिली. ते म्हणाले की, सुलिबेले यांच्या वक्तव्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळेच मंत्री एम बी पाटील यांनी राज्यात जातीय सलोखा बिघडविण्याचे काम सुरू ठेवले तर सुलिबेले यांना तुरुंगात टाकू असा इशारा दिला.

गोहत्या बंदीबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, तसेच घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे समस्या निर्माण होऊ नयेत याची दक्षता घेतली जाईल. बेळगाव नगर विकास प्राधिकरणातील गैरप्रकारांची चौकशी करण्यात येईल, असेही ते म्हणाले. बेकायदेशीर कामात स्थानिक आमदारांनी हस्तक्षेप केला आहे. अधिकाऱ्यांनी योग्य ती कागदपत्रे दिल्यास निश्चितपणे कारवाई केली जाईल. नीट काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना आमच्या जिल्ह्यातून गेटपास देण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. बाईट

Tags: