राज्यातील भाड्याच्या घरात राहणाऱ्यांसह सर्व कुटुंबांना 200 युनिट मोफत वीज दिली जाईल असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

बेंगळूरमध्ये आज पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, भाडेकरूंनाही घराची दिवाबत्ती मिळणार आहे. मोफत वीज योजना 200 युनिटच्या आत वापरणाऱ्या भाडेकरूंनाही लागू आहे. ही योजना व्यावसायिकांसाठी लागू नाही. यात कोणताही संभ्रम नसल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचवेळी भाजपच्या निषेधाच्या मुद्द्यावर त्यांना अन्य काही गोष्टी मिळाल्या नाहीत. त्यामुळे ते आंदोलन करत आहेत. भाजपकडे आंदोलन करण्याची कोणती नैतिकता आहे? 10 तास वीज देऊ असे भाजपने सांगितले होते, त्यांनी कर्जमाफी करणार असल्याचे सांगितले. सिंचनावर दीड लाख कोटी खर्च करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. यातील काय केले त्यांनी?, अशा परिस्थितीत आम्हाला प्रश्न करण्याची त्यांची नैतिकता आहे का? असा सवाल सिद्दरामय्यांनी केला.
.
भाजपने जे सांगितले ते कधीच केले नाही. आम्ही मात्र जे सांगितले ते केले. आता ते दह्यात दगड शोधणार आहेत. भाजप हा लोकविरोधी पक्ष आहे. सत्तेत असताना त्यांनी लूट केली, लाच घेतली आणि राज्याचे नाव बदनाम केले. आता ते आम्हाला धडा शिकवतात. याला आपण काय म्हणू शकतो?
भाजपने किती आश्वासने दिली ते सांगू द्या. आम्ही सत्तेत आल्याच्या 15 दिवसांच्या आत 5 हमींची अंमलबजावणी केली आहे. मी मुख्यमंत्री असताना दिलेली १६५ पैकी १५८ आश्वासने मी पूर्ण केली आहेत. इंदिरा कॅन्टीन कोणी थांबवले? पशु भाग्य, कृषी भाग्य, शू भाग्य, सायकल भाग्य कोणी थांबवले? असा प्रश्नांचा भडीमार त्यांनी भाजपवर केला.


Recent Comments