Banglore

बेंगळूरमध्ये लवकरच सुरू होणार ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावास

Share

ऑस्ट्रेलियाचे भारतातील महावाणिज्यदूत बॅरी ओ’फेरेल यांनी आज मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी माहिती तंत्रज्ञान, शिक्षण आणि इतर क्षेत्रात कर्नाटक आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कर्नाटक हे देशातील आघाडीचे राज्य आहे. तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रातही प्रगती केली आहे. ऑस्ट्रेलियासोबत विविध क्षेत्रात भागीदारी करण्यास राज्य उत्सुक आहे असे मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी सांगितले.


बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावास काही दिवसांत सुरू होणार असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला.
दक्षिण भारतातील ऑस्ट्रेलियन कौन्सुल जनरल सारा किर्लेव्ह, डेप्युटी कॉन्सुल जनरल ह्युंग-मिन किम, बेंगळूर येथे स्थापन होणाऱ्या ऑस्ट्रेलियन कॉन्सुल जनरलचे नियुक्त डेप्युटी कॉन्सुल जनरल, राज्य आयटी बीटी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. ई.व्ही. रमण रेड्डी आदी अधिकारी उपस्थित होते.

Tags: