सदाशिवनगर सेकंड में सहावा क्रॉस येथे घरात घुसणारे ड्रेनेजचे पाणी कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी स्थानिक रहिवाशी करत आहेत.
दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीवेळी या भागातील मुख्य रस्त्यावरील गटार ब्लॉक होऊन पाणी आतील गल्लीत घुसते. त्यामुळे येथे अनेक घरांमध्ये ड्रेनेजचे पाणी, सांडपाणी घुसत आहे. याबाबत रहिवाशांनी अनेकवेळा महानगर पालिकेकडे तक्रारी करूनही केवळ भेट देऊन पाहणी करण्याशिवाय काहीच कारवाई पालिकेकडून केली जात नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
याबाबत इन न्यूजशी बोलताना स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, सदाशिवनगर सेकंड मेन रोड येथे गटर रुंद असली तरी चेंबर लहान असल्याने जोरात आलेल्या पावसाचे पाणी गटारीत तुंबून त्याचा निचरा होत नाही. त्यामुळे ते येथील घरांमध्ये घुसत आहे. पालिकेने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी केली.
पावसाळा सुरु होण्यापूर्वी त्वरित ही समस्या सोडवावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.


Recent Comments