Belagavi

बेळगावात ढाल पट्टा, लाठीकाठी, भाला-तलवारबाजीचे प्रशिक्षण

Share

लहान मुला-मुलींना युवक-युवतींना मनामध्ये धाडस, शौर्य, धैर्य निर्माण करण्यासह स्वसंरक्षणासाठी ढाल पट्टा, लाठीकाठी, भाला तलवारबाजीचे प्रशिक्षण देण्याचे काम गारगोटी येथील सव्यसाची गुरुकुलकडून गावोगावी जाऊन केले जात आहे. बेळगाव येथील श्री कपिलेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या वतीने बेळगावमध्ये अशा साहसी उपक्रमाचे विनामूल्य आयोजन करून या बेळगावच्या लहान मुला-मुलींना युवक-युवतींना संधी उपलब्ध करून दिली आहे.

गेल्या आठ दिवसापासून जवळपास 120 युवा मुले-मुली या प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. मनगटामध्ये ताकत, पायामध्ये मजबुती बुद्धीचा विवेक जागृत करण्यासाठी उत्तम असे क्रांतिकारी विचार व मार्गदर्शन, धर्मवीर संभाजी महाराज यांनी दिलेले बलिदान, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आचार अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा या शिबिरामध्ये सहभागीना लाभ होत आहे. आपण कशासाठी जगले पाहिजे व या मायभूमीचे ऋण फेडले का? पाहिजे अशा अनेक विचारांचे मार्गदर्शन केले जाते. त्याचबरोबर 200 ते 250 व्यायामप्रकारांचे प्रशिक्षण या मुलांना दिले जात आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी गारगोटी येथे सव्यासाची गुरुकुल या संस्थेमार्फत लखन भीमराव पवार हे सध्या बेळगावमध्ये युवक-युवतींना अनमोल असे मार्गदर्शन देत आहेत. कशा पद्धतीने मार्गदर्शन केले जाते याबद्दल त्यांनी इन न्यूज आपली मराठी वाहिनीशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे,

चला तर पाहू
शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान व सव्यसाची गुरुकुलच्या माध्यमातून विविध ठिकाणी मार्गदर्शन दिले जात आहे, बेळगावात एवढेच नसून या गुरुकुल संस्थेमार्फत गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटकासह केरळ अशा विविध राज्यांतही मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले आहे असेही लखन पवार यांनी सांगितले, केरळामध्ये आर्मी विभागालाही आपण अनमोल असे प्रशिक्षक व मार्गदर्शन केले आहे. अशा या गारगोटी येथील उत्तम मार्गदर्शन देणाऱ्या सव्यासाची गुरुकुल संस्थेमार्फत बेळगावकरांना निश्चितच लाभ झाला आहे. याचे श्रेय मात्र बेळगावच्या श्री कपिलेश्वर मंदिर ट्रस्टच्या कमिटीला दिले पाहिजे. कारण या संस्थेने ही संधी उपलब्ध करून दिली आहे. यावेळी बेळगाव कपिलेश्वर चे ट्रस्टी अभिजीत चव्हाण यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान केले आहे.


दररोज सायंकाळी व सकाळी अशा दोन नियोजित वेळेमध्ये या युवा युतीना मार्गदर्शन दिले जात आहे निश्चितच या मार्गदर्शनामुळे युवक-युवतींचे मनोबल, धैर्य व शौर्य वाढून स्वतःचे संरक्षण करण्यास निश्चितच लाभदायक होणार यात शंका नाही.

Tags: