Banglore

सोळाव्या विधानसभेचे पहिले अधिवेशन सुरु, पहिल्या दिवशी 93 आमदारांचा शपथविधी

Share

16व्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाला आज बेंगळुरमधील विधानसौधमध्ये वंदे मातरमने सुरुवात झाली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, मंत्री आणि एकूण 93 आमदारांनी आज विधानसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली.
विधानसभेचे हंगामी अध्यक्ष आर. व्ही. देशपांडे यांनी नवीन सदस्यांना शपथ घेण्याची परवानगी दिली तर विधानसभा सचिव एमके विशालाक्षी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित केले. वरुणा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले सिद्धरामय्या यांनी परमेश्वराच्या नावाने शपथ घेतली. सभापतींना अभिवादन केल्यानंतर विरोधी पक्षातील बसवराज बोम्मयी यांनी इतर सदस्यांशी त्यांनी हस्तांदोलन केले.


कनकपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले डीके शिवकुमार यांनी गंगाधरैय्या अज्जा यांच्या नावाने शपथ घेऊन राष्ट्रनिष्ठेची शपथ घेतली. नंतर त्यांनी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांचे अभिनंदन केले. मंत्री डॉ. जी. परमेश्वर, के. एच. मुनियप्पा, के. जे. जॉर्ज, सतीश जारकीहोळी, प्रियांक खर्गे आणि रामलिंगरेड्डी यांनी सत्यनिष्ठाच्या नावाने विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतली.
मंत्री एम बी पाटील, माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी परमेश्वराच्या नावाने शपथ घेतली.
मंत्री जमीर अहमद खान यांना सचिवांनी शपथ घेण्यासाठी आमंत्रित केले तेव्हा ते हाऊसमध्ये उपस्थित नव्हते. विधानसभा सदस्य म्हणून के. एन. राजण्णा, अल्लम प्रभू पाटील, के.एस.आनंद, अरविंद बेल्लद, आर अशोक, अरग ज्ञानेंद्र, अशोक पट्टण, अशोक कुमार रे, बाबासाहेब पाटील, अविनाश जाधव, डॉ अजय धर्मसिंग, बसवनगौडा थुरुविहल, बसवराजा रायरेड्डी, बसनगौड गड्डाल, बसवनगौडा पाटील-यत्नाळ आणि इतर अनेक सदस्यांनी शपथ घेतली.
विशेष म्हणजे यत्नाळ यांनी हिंदुत्व आणि गोमातेच्या नावाने शपथ घेतली. बेळगाव उत्तर मतदारसंघातून निवडून आलेले आसिफ सेठ यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. शिवानंद पाटील बसवण्णा यांच्या नावाने, अशोक मानागुळी यांनी कुटुंबाचे दैवत, आई-वडील, मतदारसंघातील जनता आणि सत्याच्या नावाने शपथ घेतली. फ्लो
सभापतींचा सल्ला : तत्पूर्वी, 16 व्या विधानसभेचे पहिले अधिवेशन ‘वंदे मातरम’ने सुरु झाले. त्यानंतर विधानसभेवर निवडून आलेल्या नवीन सदस्यांनी कोणत्याही व्यक्तीच्या नावाने शपथ स्वीकारू नये, असा सल्ला हंगामी सभापती आर.व्ही. देशपांडे यांनी दिला. संविधानाच्या किंवा देवाच्या नावानेच शपथ घेतली पाहिजे. कोणत्याही व्यक्तीच्या नावाने शपथ घेतली तर ती कायदेशीर ठरत नाही असे त्यांनी सांगितले. बाइट
सभापतींनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री यांचे अभिनंदन करून सोळाव्या विधानसभेवर निवडून आलेल्या सदस्यांचे स्वागत व अभिनंदन केले. रमेश जारकीहोळी सुरुवातीपासूनच बसले होते. मात्र, शपथविधीसाठी त्यांचे नाव पुकारण्यात आले तेव्हा ते उपस्थित नव्हते. एक नवनिर्वाचित आमदार भगवा फेटा घालून सभागृहात आला. तसेच शिमोगा मतदारसंघातून निवडून आलेल्या चन्नाबसप्पा यांनी भगवी शाल परिधान करून शपथ घेतली.

Tags: