Banglore

सिद्धरामय्या यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; उपमुख्यमंत्रीपद डीकेशी शपथबद्ध

Share

देशभरातील विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आणि लाखो पक्ष कार्यकर्त्यांच्या साक्षीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी आज बेंगळुरू येथील कंठीरव स्टेडियममध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. डीके शिवकुमार यांनीही आज कर्नाटकच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.


कंठीरव स्टेडियममध्ये लाखो समर्थक, चाहते आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जनसागराच्या साक्षीने झालेल्या शानदार सोहळ्यात सिद्दरामय्या यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून तर केपीसीसी अध्यक्ष डीके शिवकुमार यांनीही आज कर्नाटकच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी या दोघांना तसेच कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबतच जी. परमेश्वर, के. एच. मुनियप्पा, के. जे. जॉर्ज, एम. बी. पाटील, सतीश जारकीहोळी,प्रियांक खर्गे, रामलिंग रेड्डी आणि बी. झेड. जमीर अहमद खान यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर राज्यपाल गेहलोत यांनी सिद्दरामय्या, शिवकुमार आणि मंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
सिद्दरामय्या यांनी देवाच्या नावाने तर शिवकुमार यांनी गंगाधर अज्जा यांच्या नावाने शपथ घेतली. जमीर अहमद खान यांनी अल्लाह आणि आईच्या नावाने शपथ घेतली.

Tags: