Banglore

अद्याप मुख्यमंत्री ठरला नसल्याने काँग्रेसची स्थिती उघड : बोम्मई

Share

पूर्ण बहुमत मिळूनही काँग्रेसला अद्याप मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरविता आलेला नाही. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असला तरी यावरून काँग्रेसची स्थिती उघड झाली आहे अशी टीका कार्यवाहक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली.

बेंगळुर येथील आरटी नगर येथील त्यांच्या निवासस्थानी आज बोम्मई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, लोकांनी काँग्रेसला पूर्ण बहुमत दिले आहे. आता त्यांचे सरकार राज्याचे आणि लोकांचे कल्याण करेल अशी आशा करू. आता मुख्यमंत्री कोण व्हावे हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र पूर्ण बहुमत मिळूनदेखील त्यांना अद्याप मुख्यमंत्री ठरविता आलेला नाही. यावरून काँग्रेसची अंतर्गत स्थिती दिसून येते असा चिंता त्यांनी काढला.

काँग्रेस लिंगायत, वक्कलिगा आणि अल्पसंख्यांक समुदायाला न्याय देईल का? या प्रश्नावर, निवडणुकीत काँग्रेसने या तिन्ही पक्षांचे तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न केलाय. आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्य महत्वाची कोणती पदे ते त्यांना देतात, त्यांचे कसे समाधान करणार हे बघावे लागेल अशी प्रतिक्रिया बोम्मई यांनी दिली. बाईट
एकंदर, अद्याप मुख्यमंत्री निश्चित करता न आल्यावरून बोम्मई यांनी काँग्रेसला चिंता काढल्याचे यावेळी दिसून आले.

Tags: