Belagavi

अशोक सिदनाळ यांचे मरणोत्तर नेत्र, देहदान

Share

हुबळी येथील सेकंड स्टेज, शिरूर पार्क येथील रहिवासी व सेवानिवृत्त ग्रंथपाल अशोक वीरभद्रप्पा सिदनाळ (वय 74) यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली व मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या इच्छेनुसार बैलहोंगलच्या डॉ.रामण्णवर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांचे नेत्र व देह दान करण्यात आला.

त्यांचे नेत्र एम. एम. जोशी नेत्रभंडारला देण्यात आले. त्यामुळे दोघांचे आयुष्य उजळून निघणार आहे. त्यांचा मृतदेह बैलहोंगल येथील एसजीव्ही आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दान करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. सुभाष बागडे यांनी शरीर रचना विभागासाठी सन्मानपूर्वक मृतदेह स्वीकारला.

 

रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव डॉ. महांतेश रामण्णावर यांनी सिदनाळ कुटुंबीयांचे आभार मानले. या संदर्भात देहदानाचे महत्त्व व त्याची उपयुक्तता यावर डॉ. रामण्णावर यांनी, सामान्य लोकांची अंधश्रद्धा तसेच शरीर दान करताना मृत्यू प्रमाणपत्राची आवश्यकता आहे, शिरूर पार्कमधील नागरिकांना सविस्तर माहिती दिली. अवयव दान आणि अवयव दानाबद्दल अधिक माहितीसाठी, बैलहोंगलच्या डॉ. रामण्णवर चॅरिटेबल ट्रस्टशी 9242496497 या क्रमांकावर संपर्क साधता येईल असे कळविण्यात आले आहे.

Tags: