Belagavi

पाणी योजनेच्या खड्ड्यामुळे सुभाष नगरवासीय अडचणीत

Share

निरंतर पाणी योजनेच्या रखडलेल्या कामामुळे सुभाषनगरातील रहिवासी, वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेल्या पाणीपुरवठ्याच्या कामांविरोधात स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.

हा एक असा रस्ता आहे जिथे शेकडो वाहने ये-जा करतात परंतु सध्या वाहनधारकांसाठी तो एक अडचणीचा ठरत आहे. हा शहराचा मुख्य आणि इतर रस्त्यांना जोडणारा हा रस्ता आहे. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईन घालण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्डयाकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ढुंकूनही पाहिलेले नाही.
रस्त्यालगत हॉस्पिटल, शाळा आणि समुदाय भवन हॉल आहे. त्यामुळे येथून शेकडो लोक दररोज ये-जा करतात. पण येथे खोदलेल्या खड्ड्यामुळे वाहनधारकांवर जीव मुठीत धरून जाण्याची परिस्थिती आली आहे.

याविषयी तक्रार करताना येथील रहिवाशांनी सांगितले की, रखडलेल्या कामामुळे स्थानिक लोकांची मोठी अडचण होत आहे. या रस्त्यावरून दररोज प्रवास करण्यास घाबरतात, लहान मुले व वृद्धांनाही वाहनांच्या वाहतुकीत मोठा त्रास होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा मंडळाने खड्डा खोदून तो दुरुस्त न करता तसाच टाकून दिल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.

अर्धवट राहिलेल्या कामामुळे जनतेला सतत त्रास होत असून हे काम लवकरात लवकर पूर्ण करून वाहतुकीसाठी खुले करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली.

Tags: