बेळगाव दक्षिण मतदारसंघात काँग्रेस उमेदवार प्रभावती मास्तमर्डी यांच्यासाठी आयोजित केलेली भव्य प्रचार रॅली सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी करण्यात आली.


शहापूर येथील शिवाजी गार्डनमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून या प्रचार रॅलीची सुरुवात करण्यात आली. तेथून खुल्या वाहनातून प्रचार सुरू होऊन जगद्गुरू बसवेश्वर सर्कल, खासबाग मार्गे बेळगाव दक्षिण काँग्रेस कार्यालयासमोर संपला. मतदारसंघातील सर्व लोकांनी घराबाहेर पडून पाठिंबा दर्शवला . राज्याला काँग्रेस पक्षाची नितांत गरज असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या सभेत काँग्रेस पक्षाचे नेते, शेकडो कार्यकर्ते मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.


Recent Comments