election

भाजप उमेदवारासाठी सुदीपचा हुबळीत भव्य रोड शो

Share

प्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेता किच्च सुदीप याने हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघात जगदीश शेट्टर यांच्या विरोधात उभा असलेल्या भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आज भव्य रोड शो करून मतयाचना केली.

होय, राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेले माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या हुबळी-धारवाड मध्य विधानसभा मतदारसंघात आपली विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

तर दुसरीकडे मात्र यावेळी भाजपने शेट्टर यांचा पराभव करत आपला बालेकिल्ला सुरक्षित करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपने आज अभिनेता किच्चा सुदीप याचा रोड शो घेतला.

सुदिपने भाजपचे उमेदवार महेश टेंगीनकाई यांच्या प्रचारार्थ भव्य रोड शो केला. येथील राजाजीनगर येथील देवांगपेठ येथून हा रोड शो सुरू होऊन बेनगेरी येथील कल्लेश्वर मंदिरापर्यंत गेला. यावेळी पुष्पवृष्टी करत नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

Tags: