डबल इंजिन सरकारच्या विकासकामांमुळे कर्नाटकात भारतीय जनता पक्षाच्या बाजूने वातावरण आहे. त्यामुळे 150 जागांचे उद्दिष्ट गाठून निश्चितपण भाजप सत्तेवर येईल असा विश्वास उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी व्यक्त केला.
बेळगावात पत्रकार परिषदेत बोलताना उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य म्हणाले की, देशातील अनेक राज्यात काँग्रेसचे अस्तित्व मिटले आहे.
या निवडणुकीत कर्नाटकातही तेच होणार आहे. भाजपच्या विरोधात जे-जे पक्ष ओरड करताहेत त्यांचे भ्रष्टाचार करून स्वार्थ साधने हे एकच उद्दिष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने विविध गरीब कल्याण योजनांत होणार भ्रष्टाचार टाळून थेट लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा केले. 27 लाख कोटी रुपये नुदानाचा थेट फायदा या लाभार्थ्यांना झाला आहे. विकासशील, गरिबीमुक्त, आतंकवादमुक्त, नक्षलवादमुक्त भारत बनवून देशाला जगात मानाचे स्थान मोदी सरकारने मिळवून दिले आहे.
डबल इंजिन सरकारचा कर्नाटकाला मोठा फायदा झाला आहे असे सांगून मौर्य म्हणाले की, राज्यात रस्ते, रेल्वे, विमान संपर्कव्यवस्थेत सुधारणा, जलजीवन मिशन अंतर्गत घरोघरी शुद्ध पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी विक्रमी नळजोडण्या देण्यात आल्या. आयुष्यमान भारत, गरिबकल्याण, नेकार सन्मान, रयतविद्यानिधी अशा अनेक कल्याणकारी योजना डबल इंजिन सरकारने कर्नाटकातील जनतेला दिल्या आहेत. पाटबंधारे योजनांना गती दिली आहे. या सर्व विकासकामांमुळे कर्नाटकातील जनता भाजपलाच विजयी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना बेळगाव दक्षिणचे भाजप उमेदवार आ. अभय पाटील यांनी बेळगाव दक्षिण मतदारसंघाचा 95% विकास तर आपण केलेलाच आहे, आता मतदार संघात रोजगार निर्मिती करून बेरोजगारी हटविण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती दिली. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीत आज मतदार संघात व्यापाऱ्यांशी चर्चा, सभा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मतदार संघात रोजगार निर्मिती करून बेरोजगारी हटविण्याचे आपले उद्दिष्ट आहे. ‘बियाँड बेंगळूर’ ही आमच्या भाजप सरकारची घोषणा असली तरी ‘बियाँड बेंगळूर अप टू बेलगाम’ ही माझी घोषणा आहे. बेळगावचा औद्योगिक विकास करून त्यातून रोजगार निर्मितीची संकल्पना यामागे आहे. बेळगावात रशियन इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी आपला प्रकल्प सुरु करणार आहे. येत्या 6 महिन्यात हा प्रकल्प सुरु होणार आहे. यावेळच्या निवडणुकीत किती मताधिक्य मिळेल या प्रश्नावर मागीलवेळी अपेक्षेहून अधिक मताधिक्य मिळाले यावेळीही तसेच होईल असे त्यांनी सांगितले. बाईट


Recent Comments