Belagavi

बसवजयंतीनिमित्त बेळगावात भव्य चित्ररथ मिरवणूक

Share

अंधश्रद्धेच्या अंधारात चाचपडणाऱ्या समाजाला समतेची प्रकाशवाट दाखवणारे विश्वगुरू बसवण्णा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित प्रसंगाची भव्य सवाद्य चित्ररथ मिरवणूक बेळगावात आज काढण्यात आली. सर्व वयोगटातील लिंगायत समाजबांधव-भगिनींनी अत्यंत उत्साहात या मिरवणुकीत जल्लोषात सहभाग घेतला.
जगद्गुरू बसवेश्वर यांची आज ८९० वी जयंती राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात येत आहे. बेळगावातही विविध लिंगायत संघटनांतर्फे सकाळी बसवण्णा यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करून सायंकाळी कारंजीमठाचे गुरुसिद्ध स्वामीजींच्या सानिध्यात चित्ररथांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

राणी चन्नम्मा चौकात सायंकाळी पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी आमदार अनिल बेनके, भाजप प्रवक्ते एम. बी. जिरली, काँग्रेसचे उत्तरमधील उमेदवार राजू सेठ, आम आदमीचे उमेदवार राजू टोपन्नावर, जेडीएसचे उमेदवार शिवानंद मुगळीहाळ यांच्यासह वीरशैव लिंगायत महासभेच्या महिला विभाग अध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद, लिंगायत संघटनेचे अध्यक्ष बसवराज रोट्टी, इरण्णा दयेन्नावर, शंकर गुडस, गुरुदेव पाटील आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

बसवेश्वरांच्या जीवनातील विविध प्रसंगांवर आधारित देखावे चित्ररथांवर साकारण्यात आले होते. त्याचप्रमाणे या प्रसंगावर आधारित पोट्रेट्स, कटआउट्स, बॅनर देखील मांडण्यात आले होते. मिरवणुकीच्या अग्रभागी उत्साही युवक वादकांचा समावेश असलेली ढोल-ताशा, झांज व लेझीम पथके आपल्या वादन कौशल्याचे प्रदर्शन करत होती. लिंगायत धर्माचा उल्लेख असलेले भगवे ध्वज हाती घेऊन शुभ्र कपडे परिधान करून शिस्तबद्धरीत्या युवक-युवती मिरवणुकीत सहभागी झाले होते.

चन्नम्मा चौकातून सुरु झालेली मिरवणूक काकतीवेस रोड, शनिवार खुंट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, कॉलेज रोड मार्गे फिरून मिरवणुकीची लिंगराज कॉलेज मैदानावर सांगता झाली

 

.

दरम्यान, यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. अनिल बेनके म्हणाले, बसवेश्वरांनी बाराव्या शतकात वचनांच्या माध्यमातून समाजाला जे मार्गदर्शन केले ते समकालीन समाजालाही तंतोतंत लागू पडते. त्यांच्या वचनांचे, तत्व-सिद्धांतांचे पालन सर्वांनी विशेषतः आजच्या युवकांनी केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. बाईट
यावेळी बोलताना काँग्रेसचे म्हणणे अध्यक्ष व उत्तर मतदारसंघातील उमेदवार राजू सेठ यांनी, जगद्गुरू बसवेश्वर यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून वाटचाल केल्यास समाजात शांती, सौहार्द नांदू शकेल. बेळगावात काल रमजान ईद साजरी झाली. आज शिवाजी महाराजांची आणि बसवण्णा यांची जयंती साजरी होत आहे. बेळगावच्या परंपरेला अनुसरून तिन्ही उत्सव सौहार्दाने, शांततेत साजरे करण्यात येत आहेत. असेच सौहार्द शहरात टिकून रहावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बाईट
दरम्यान, युवक-युवतींच्या आणि लिंगायत समाजबांधवांच्या अमाप उत्साहात बसवेश्वर जयंतीची चित्ररथ मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडली. मिरवणूक मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

Tags: