विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव जिल्ह्यात आज दुसऱ्या दिवशी 46 अर्ज दाखल करण्यात आले. त्यामुळे दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची एकूण संख्या 74 झाली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शनिवारी सुरु झाली. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी 38 उमेदवारांनी 46 अर्ज सादर केले. त्यापैकी 44 उमेदवार पुरुष असून 2 महिला उमेदवार आहेत.
काही उमेदवारांनी अर्जाचे 2 किंवा त्याहून अधिक सेट दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या दोन दिवसांत जिल्ह्यात एकूण 74 अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
मतदारसंघनिहाय दाखल झालेल्या उमेदवारी
अर्जाचा तपशील असा : बेळगाव उत्तर : 5, बेळगाव दक्षिण : 2, बेळगाव ग्रामीण : 2, खानापूर : 9, कित्तूर : 4, बैलहोंगल : 8, सौंदत्ती : 5, रामदुर्ग : 9, निपाणी : 6, चिक्कोडी-सदलगा : 4, अथणी : 7, कागवाड : 4, कुडची : 2, रायबाग : 0, हुक्केरी : 0, अरभावी : 2, गोकाक : 5, यमकनमर्डी : 0.
दरम्यान, उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला गती येण्याची शक्यता आहे.


Recent Comments