Banglore

लक्ष्मण सवदी यांच्या काँग्रेस प्रवेशावर शिक्कामोर्तब

Share

अथणी मतदारसंघाचे तिकीट भाजपने नाकारल्याने , नाराज झालेले लक्ष्मण सवदी काँग्रेसमध्ये दाखल होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे . यासंदर्भात त्यांनी केपीसीसी अध्यक्ष डी के शिवकुमार आणि काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला याची बेंगळूरमध्ये भेट घेऊन चर्चा केली आहे .

 

विशेष विमानाने , लक्ष्मण सवदी बेंगळूरला रवाना झाले होते . त्या ठिकाणी त्यानी केपीसीसी अध्यक्ष डी के शिवकुमार आणि काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला तसेच विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या यांची भेट घेऊन चर्चा केली आहे . त्यांच्या काँग्रेस प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे . यासंबंधीची अधिकृत घोषणा दुपारी २ वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत केली जाणार आहे .

Tags: