Belagavi

आंबेडकरांचे जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी – तहसीलदार एस.बी.इंगळे.

Share

हुक्केरी शहरात तालुका प्रशासन व समाजकल्याण विभागाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती अर्थपूर्णरीत्या साजरी करण्यात आली.
शहरातील आंबेडकर नगर येथे तहसीलदार एस.बी.इंगळे व समाजाच्या नेत्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात केली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना, संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श प्रत्येकाच्या जीवनाचा मार्ग आहे. ते म्हणाले की, बाबासाहेबांची सामाजिक कळकळ आजही तरुणांना प्रेरणा देत आहे.

सामाजिक नेते सुरेश तलवार यांनी बोलतांना सांगितले की, निवडणूक आचारसंहिता लक्षात घेऊन तालुका प्रशासन साधे व अर्थपूर्ण पद्धतीने ही जयंती साजरी करीत आहे .

वाद्यांच्या गजरात निघालेली ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून तालुका पंचायत आवारात आली.

त्यानंतर हेब्बाळ येथील बसवचेतन देवरु यांच्या दिव्य उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात समाजकल्याणचे सहाय्यक संचालक एच.ए.माहुत यांनी अधिकारी व दलित नेत्यांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.तालुका प्रशासन व समाज कल्याण विभागाच्या वतीने आज बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. शासकीय नियमानुसार अर्थपूर्ण व्याख्यान पार पडले .

व्यासपीठावर तालुका महसूल विभागाचे उपतहसीलदार एन.आर.पाटील, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी विलासराज, संकेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमेश गुडड, एडीएलआर शशिकांत हेगडे, बीईओ मोहन दंडिन, सविता हळकी आदी उपस्थित होते.
कलबुर्गी येथील प्रख्यात विचारवंत विठ्ठल वग्ना यांचे आंबेडकरांवरील व्याख्यान झाले.
यावेळी दलित नेते उदय हुक्केरी, सुनील भैरन्नवर, केम्पण्णा शिरहट्टी, भाऊसाहेब पांढरे , रमेश हुंजी, एल बी मलदार , एस एम नडमनी , एम.बी.कांबळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Tags: