विधानसभा निवडणुकीसाठी पार्श्वभूमीवर, कागदपत्रांशिवाय बसमधून नेण्यात येत असलेले पैसे पोलिसांनी जप्त केल्याची घटना मंगळवारी विजापूर जिल्ह्यातील निडगुंदी शहरातील येलगुर क्रॉस चेक पोस्टजवळ घडली.
९.९५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आला आहे. होस्पेटहून विजापूर येथे निघालेल्या केएसआरटीसी बसमधून हे पैसे जप्त करण्यात आले. ही रक्कम नूरखान धापेदार यांच्याकडे सापडली. हे पैसे कांदे विकून आल्याचे नूर खान यांनी म्हटले आहे. तहसीलदारांनी कागदपत्र देऊन पैसे जमा करण्याच्या सूचना दिल्या. ही घटना निडगुंदी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत घडली.


Recent Comments