बेळगाव जिल्ह्यातील सदलगा-दत्तवाड चेकपोस्टवर आज एफएसटी आणि पोलिस अधिकाऱ्यांनी कोणत्याही कागदपत्रांशिवाय अवैधरित्या वाहतूक केली जाणारी 50 लाख रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव या सीमावर्ती जिल्ह्यात चेकपोस्टच्या माध्यमातून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तेथील एफएसटी व पोलिस अधिकार्यांनी 50 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केल्याची माहिती बेळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी दिली.


Recent Comments