Belagavi

नेहरूनगर , एपीएमसी रोडवरील फुटपाथ झाले मोकळे

Share

बेळगाव स्मार्ट सिटीतील रस्त्यांच्या फुटपाथवरील अतिक्रमणे आज पोलिसांनी हटवली . या अतिक्रमित दुकानांमुळे पादचाऱ्यांना तसेच वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता . मात्र आता हे अतिक्रमण हटवाल्याने , पादचाऱ्यांना सोयीस्कर झाले आहे .

शहरातील स्मार्ट रस्त्यावर अतिक्रमण वाढले आहे . त्याचबरोबर रस्त्याशेजारी फूटपाथ आणि , सायकल ट्रॅकवर विक्रेत्यानी आपापले व्यवसाय थाटले आहे . , नारळपाणी , कलिंगड , उसाचा रस , भाजीपाला , फुलांचे स्टॉल , फुलविक्रेत्यांचे स्टॉल यामुळे फुटपाथवर पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच उरलेली नाही . यामुळे पादचारी आणि वाहनधारकांना देखील याचा त्रास होत होता . शहरातील मुख्य रस्त्यांप्रमाणेच , नेहरूनगर , एपीएमसी रोडवरील फुटपाथवर ह्या विक्रेत्यानॆ आपली दुकाने थाटून , फुटपाथवर अतिक्रमण केले होते . त्यामुळे , पादचाऱ्यांना रस्त्यावरून , गाड्यांमधून वाट काढत जावे लागत होते . वास्तविक पाहता , ही अशी अतिक्रमणे हटवण्याची जबाबदारी ही महानगर पालिकेची असते . मात्र बेळगावची महानगर पालिका सुस्तावली आहे .

फुटपाथवर अतिक्रमण वाढल्याने, शहराच्या सौंदर्याला आणि रहदारीलादेखील अडथळा निर्माण होत असलेले दिसून देखील कोणतीच कारवाई करायला कोणीच तयार नाहीत . यावरून या विक्रेत्यांना , फुटपाथवर व्यवसाय करण्यासाठी कोणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न नागरिकांना पडत होता .. वास्तविक , फुटपाथवर मोकळे ठेवावेत अशी सर्वोच्च न्यायालयाची गाईडलाईन आहे . मात्र बेळगावमध्ये , याचे सर्रास उल्लंघन झालेले दिसून येत आहे . हे अतिक्रमण हटवण्याकडे महापालिकेने काणाडोळा केला आहे . त्यामुळे आज नेहरूनगर एपीएसमी रोडवरील हे अतिक्रमण पोलिसांनीच हटवले . पोलिसांच्या या कारवाईमुळे , जनतेने या कारवाईचे कौतुक केले आहे .

Tags: