Belagavi

गुरुदेवी अंगडी यांचे मरणोत्तर देहदान नेत्रदान त्वचादान, जायंट्स आय फौंडेशनचा पुढाकार

Share

बेळगाव: नार्वेकर गल्ली येथील रहिवासी गुरुदेवी अंगडी यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

तीन वर्षापूर्वी गुरुदेवी अंगडी यांनी जायंट्स आय फौंडेशनच्या माध्यमातून मरणोत्तर देहादानाचा संकल्प केला होता त्याला अनुसरून आज त्यांच्या मृत्यूनंतर रात्री उशिरा जेएनएमसी वैद्यकीय महाविद्यालयाला देहदान करण्यात आला. तसेच रोटरी केएलई स्किन बँकेला त्वचादान करण्यात आली.केएलईच्या नेत्रविभागाला नेत्रदान करण्यात आले.

त्वचादानाची प्रक्रिया डॉ चिराग,डॉ तनिष्क डॉ लावण्या आणि शिवराज पाटील यांनी तर नेत्रदानाची प्रक्रिया डॉ कीर्ती,डॉ ईशा आणि डॉ रुची यांनी पूर्ण केली,
संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जायंट्स आय फौंडेशनचे संस्थापक मदन बामणे व अध्यक्ष शिवराज पाटील उपस्थित होते.

यावेळी शरीरशास्त्र विभागाचे वीराण्णा रोन्नद यांचे विशेष सहकार्य लाभले.

Tags: